माळवींनी केले स्वत:विरोधात मतदान

By Admin | Updated: March 21, 2015 01:34 IST2015-03-21T01:34:50+5:302015-03-21T01:34:50+5:30

लाचखोरीत अडकलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या ठरावाच्या बाजूने उपस्थित सर्वच ७२ नगरसेवकांनी मतदान करत ठरावास संमती दिली.

Polls against themselves made by Malwis | माळवींनी केले स्वत:विरोधात मतदान

माळवींनी केले स्वत:विरोधात मतदान

कोल्हापूर : लाचखोरीत अडकलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या ठरावाच्या बाजूने उपस्थित सर्वच ७२ नगरसेवकांनी मतदान करत ठरावास संमती दिली. विशेष म्हणजे, माळवी यांनीही ठरावाच्या बाजूने मतदान केले. तत्पूर्वी, माळवी यांचे नगरसेवकपद महापालिका अधिनियमनानुसार रद्द करण्याची शिफारस राज्य शासनास करण्यासाठीच्या ठरावावर सभागृहात चर्चा किंवा मतदान करण्यास हरकत नाही, असा निकाल शुक्रवारी सकाळी कनिष्ठ स्तर न्यायालयाने दिला.
सभागृहात एकूण ८२ सदस्यांपैकी ७७ सदस्य उपस्थित होते. पाच स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे महापौरांसह सर्व उपस्थित ७२ नगरसेवकांनी हात वर करून ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर सत्ताधारी नगरसेवकांनी जोरदार बाके वाजवून आनंद व्यक्त केला. हा ठराव विनाविलंब शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Polls against themselves made by Malwis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.