ईव्हीएमऐवजी मतपेटीत मतदान
By Admin | Updated: May 22, 2016 03:22 IST2016-05-22T03:22:56+5:302016-05-22T03:22:56+5:30
विधान परिषदेच्या एका जागेसाठी ठाणे व पालघर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

ईव्हीएमऐवजी मतपेटीत मतदान
सुरेश लोखंडे, ठाणे
विधान परिषदेच्या एका जागेसाठी ठाणे व पालघर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ३ जून रोजी होणाऱ्या या मतदान प्रक्रियेच्या वेळी मतदान यंत्रांऐवजी मतपेटीत मत टाकून मतदाराला आपला हक्क बजावता येणार आहे.
विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती वसंत डावखरे यांच्या सदस्यत्वाची मुदत ८ जून रोजी संपत आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या एका जागेसाठी ही निवडणूक जिल्ह्यात रंगायला लागली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार डावखरे यांच्याविरोधात शिवसेना-भाजपाच्या महायुतीचे रवींद्र फाटक निवडणूक रिंगणात आहे. यासाठी जिल्हाभरातील एक हजार साठ मतदारांना या वेळी मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. या सदस्यांना मतपेटीतून आपल्या पसंतीच्या उमेदवारासाठी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यासाठी १३ मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. त्यात संपूर्ण एक हजार ६० मतदार मतदान करणार आहेत.
या मतदान केंद्रांत कमीतकमी १९ ते जास्तीतजास्त १३३ मतदारांना मतदान करण्याची व्यवस्था केली आहे. परिसरातील अर्धा किमी ते आठ किमी परिसरातील मतदारांना मतदान करता येणार आहे. रेल्वे स्टेशनपासून केवळ अर्धा ते आठ किलोमीटर अंतरावर ही मतदान केंद्रे सुरू राहणार आहेत. यासाठी डहाणू, जव्हार, भिवंडी आणि उल्हासनगर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनांची निवड केलेली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदार
डहाणू नगर परिषद२५
जव्हार नगर परिषद१९
पालघर न.प. व जि.प.९६
शहापूर नगर पंचायत१९
वसई-विरार मनपा१२०
भिवंडी-नि. मनपा९५
कल्याण-डोंबिवली मनपा १२७
मुरबाड न. पंचायत१९
उल्हासनगर मनपा७९
मीरा-भार्इंदर मनपा९८
ठाणे मनपा १३३
नवी मुंबई मनपा११६
अंबरनाथ/ बदलापूर११४
नगर परिषद