पोलिंग एजंटकडून केंद्रात सर्रास मोबाईलचा वापर; पोलीसांची कारवाई
By Admin | Updated: February 21, 2017 15:38 IST2017-02-21T15:38:59+5:302017-02-21T15:38:59+5:30
महापालिका निवडणूकीची मतदान प्रक्रिया नाशिकमध्ये शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे
पोलिंग एजंटकडून केंद्रात सर्रास मोबाईलचा वापर; पोलीसांची कारवाई
नाशिक : महापालिका निवडणूकीची मतदान प्रक्रिया नाशिकमध्ये शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे; मात्र दुसरीकडे गालबोट लावणाऱ्या किरकोळ घटना घडतच असून केंद्रात सर्रासपणे पोलिंग एजंटकडून मोबाईलचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अंबड येथील एका केंद्रावरील बुथमध्ये बसलेल्या पोलिंग एजंटकडून सर्रासपणे मोबाईल बाळगण्यास आल्याची बाब काही मतदारांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी सदर केंद्रावरील सर्व बुथमधील पोलिंग एजंटची झाडाझडती घेत सुमारे २५हून अधिक मोबाईल जप्त केले आहेत.
पोलिंग एजंटला केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करण्यास सक्त बंदी असताना देखील मोबाईल वापरल्यामुळे संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.