शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:46 IST

Maharashtra Election 2024: मराठी मुस्लिम सेवा संघाचे एक पत्र समोर आले असून, त्यात त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Kirit Somaiya on MVA : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मुस्लिम संघटनांकडून महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. या संपूर्ण प्रकरणात मतांचे ध्रुवीकरण होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच, अल्पसंख्याक समाजाला स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारची आश्वासने दिली जात असल्याचे भाजपचे म्हणने आहे.

अशातच, महाराष्ट्रातील मराठी मुस्लिम सेवा संघाचे एक पत्र समोर आले असून, त्यात त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. संघटनेचे एक पत्रही समोर आले आहे, ज्यात त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. यातील अनेक मागण्या वादग्रस्त असल्याचा आरोप भाजपचा आहे. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून, या संस्थेसह इतर अनेक संस्थांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

"मराठी मुस्लिम सेवा संघ"चे आवाहन1. ज्यांनी शेकडो निरपराध मुस्लिमांची हत्या केली, त्यांना तुम्ही मत द्याल का?2. ज्यांनी अलिगड मुस्लिमांकडून हिसकावून घेतला, त्यांना तुम्ही मत द्याल का?3. मुस्लिमांवर समान नागरी कायदा लागू करणाऱ्यांना तुम्ही मतदान कराल का?4. मदरसे रद्द करण्याचा विचार करणाऱ्यांना तुम्ही मतदान कराल का?5. वक्फच्या विरोधात असलेल्यांना तुम्ही मत द्याल का?6. ज्यांनी आमच्यावर CAA, NRC लादले, त्यांना तुम्ही मत द्याल का?7. जे आमच्या मुलींच्या डोक्यावरून हिजाब काढतात, त्यांना तुम्ही मत द्याल का?8. मशिदीत घुसलेल्या व्यक्तीच्या पाठीशी उभ्या असलेल्या पक्षांना तुम्ही मत द्याल का?9. जे आमच्या मुस्लिमांच्या वस्त्या बुलडोझरने उद्ध्वस्त करतात, त्यांना तुम्ही मत द्याल का?10. आपले बहुमोल मत देऊन महाविकास आघाडीला यशस्वी करा.

किरीट सोमय्यांची सोशल मीडियावर माहिती किरीट सोमय्या यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले, "मी धार्मिक भावना भडकावण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मराठी मुस्लिम सेवा संघ आणि अशा 400 स्वयंसेवी संस्था मुस्लिमांना व्होट जिहादसाठी भडकवत आहेत. धार्मिक भावनांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परिणामी दंगली होऊ शकतात. ."

मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "मी मराठी मुस्लिम सेवा संघ आणि इतर अशा एनजीओच्या विरोधात मुस्लिमांना भडकावल्याबद्दल आणि धार्मिक मोहिमा चालवल्याबद्दल मुलुंड पूर्व पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. माझी तक्रार निवडणूक आयोग आणि मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांकडेही पाठवण्यात आली आहे."

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Kirit Somaiyaकिरीट सोमय्याMuslimमुस्लीम