शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

राज्यातील हिंसाचारावरून राजकीय आखाडा तापला; केंद्र-राज्य सरकारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 06:58 IST

राज्यात राजकीय आखाडा तापला असून राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू केली आहे. 

मुंबई : त्रिपुरातील कथित धार्मिक हिंसाचारावरून राज्यात शुक्रवारी बंददरम्यान ज्या हिंसक घटना घडल्या त्याविरोधात राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदवेळी अमरावतीत शनिवारी पुन्हा हिंसाचार होऊन संचारबंदी लावण्यात आली. त्यानंतर राज्यात राजकीय आखाडा तापला असून राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू केली आहे. नांदेडमध्ये तीनशे जणांवर गुन्हे शुक्रवारी नांदेड बंददरम्यान करण्यात आलेल्या दगडफेक व वाहने जाळपोळ प्रकरणात विविध पोलीस ठाण्यांत तीनशे जणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत तर दहाहून अधिक जणांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरू होती. शहराच्या विविध भागात लावलेले सीसीटिव्ही कॅमेरे, व्हिडीओवरुन आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. रझा ॲकॅडमीच्या आयोजकांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. 

मालेगावमध्ये दहा अटकेत, ५०० जणांविरुद्ध गुन्हामालेगाव : त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या शुक्रवारच्या बंदला हिंसक वळण लागून दगडफेक व मालमत्तेच्या नुकसानीचे प्रकार घडले. या प्रकरणी हुल्लडबाजी करणाऱ्या ४०० ते ५०० जणांविरुद्ध विनापरवाना मोर्चा व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन व दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दहा जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी परिस्थिती नियंत्रणात होती. पूर्व व पश्चिम भागात व्यवहार सुरळीत होते. दगडफेकीच्या घटनेतील संशयित आरोपींमध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी पोलीस नियंत्रण कक्षात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.महागाईवरून लक्ष हटवण्यासाठी दंगलीचे कारस्थान - राऊत औरंगाबाद : महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे. फालतू विषयांवर लोकांची दिशाभूल करण्याचे राजकारण असून, महाराष्ट्रात दंगली घडवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे कारस्थान चालू आहे, असा आरोप शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. सरकार पाडण्याच्या तुम्ही कितीही तारखा देत राहा, आमचे सरकार २५ वर्षे राहील, असे ते म्हणाले. महागाईविरोधातील शिवसेनेनेच्या मोर्चाला ते संबोधित करीत होते.विघ्नसंतोषींकडून दंगली घडविण्याचे काम : अजित पवारजाती-धर्माचे राजकारण न करता सर्वांनी एकोप्याने रहावे. हिंसाचारात गरिबांचे नुकसान होते. कोरोना, नैसर्गिक आपत्ती या घटनेला महाविकास आघाडी सरकार यशस्वी तोंड देऊन उभारी घेत असताना काही विघ्नसंतोषी लोकांना ते बघवत नाही. राज्यात दंगली घडविल्या जात आहेत. सर्वानी शांतता राखावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जामखेड (जि. अहमदनगर) येथे केले.