शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

OBC Reservation : राज्य सरकारला मोठा झटका, ओबीसींसाठीचे राजकीय आरक्षण रद्द; इम्पिरिकल डेटाची विनंतीही फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 06:00 IST

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय.

नवी दिल्ली : ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि २०११ च्या जनगणनेतील ओबीसींची माहिती या दोन्ही विषयांवर महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठाच धक्का बसला. न्यायालयाने ओबीसींचे २७ टक्के आरक्षण रद्द करून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिला आणि दुसरीकडे केंद्राकडून इम्पिरिकल डेटा मिळावा, ही राज्याची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली.या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्णपणे रद्द झाले असून, ओबीसींसाठीच्या राखीव जागा आता खुल्या झाल्या आहेत. सध्या राज्यात दोन जिल्हा परिषदा, नगर पंचायती आदींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. तिथे २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यात बदल केले जात नाहीत. मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाला ओबीसींसाठी असलेल्या सर्व जागा खुल्या प्रवर्गात घालाव्या लागतील. त्यासाठी निवडणुका पुढे ढकलणार का, हे स्पष्ट व्हायचे आहे.ओबीसींना १९९३ पासून राज्यात राजकीय आरक्षण होतेच. पण काही जिल्ह्यांत अनुसूचित जाती, जमाती, भटके व विमुक्त यांचे तसेच ओबीसींचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले. तितके आरक्षण देता येत नसल्याचा दावा काहींनी याचिकेद्वारे न्यायालयात केला. तो न्यायालयाने मान्य केल्याने ओबीसी आरक्षण रद्द झाले.त्यानंतर ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने वटहुकूम काढला. पण त्याला न्यायालयाने  ६ डिसेंबर रोजी स्थगिती दिली आणि न्या. अजय खानविलकर व न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने तो वटहुकूमच रद्दबातल ठरविला. त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती तसेच भटके व विमुक्त यांच्यासाठीच आरक्षण राहील आणि बाकी सर्व जागा खुल्या होतील. तसा नवा आदेश काढून निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे.

कोर्टाच्या आदेशास बांधील : निवडणूक आयुक्तसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळवत आहोत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन राज्य निवडणूक आयोगाला करावेच लागेल, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आयोग निवडणुका पुढे ढकलेल का, याबाबत साशंकता आहे.न्यायालयाच्या आदेशामुळे २१ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेतील २३ ओबीसी, १५ पंचायत समित्यांमधील ४५ ओबीसी राखीव जागा, १०६ नगर पंचायतींमधील ३४४ ओबीसी राखीव रद्द झाल्या आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रOBC Reservationओबीसी आरक्षण