राजकीय कोपरखळ्यांनी ‘गळीत हंगाम’ सुरू
By Admin | Updated: November 15, 2014 02:13 IST2014-11-15T02:13:24+5:302014-11-15T02:13:24+5:30
खैरेंना दिलेली मंत्रिपदाची ऑफर, त्याचवेळी मी कट्टर शिवसैनिक असून, सेनेतेच राहणार असल्याचा खैरेंनी केलेला खुलासा.. अशा राजकीय कोपरखळ्यांनी पैठणकरांची करमणूक केली.

राजकीय कोपरखळ्यांनी ‘गळीत हंगाम’ सुरू
पैठण/जायकवाडी (जि. औरंगाबाद) : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खा. चंद्रकांत खैरे यांना भाजपा प्रवेशाचे दिलेले अप्रत्यक्ष निमंत्रण आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खैरेंना दिलेली मंत्रिपदाची ऑफर, त्याचवेळी मी कट्टर शिवसैनिक असून, सेनेतेच राहणार असल्याचा खैरेंनी केलेला खुलासा.. अशा राजकीय कोपरखळ्यांनी पैठणकरांची करमणूक केली.
पैठण येथील संत एकनाथ-सचिन घायाळ शुगर लि.च्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी शहा यांच्या हस्ते झाला. यानंतर झालेल्या सभेत भाजपा-सेना नेत्यांनी परस्परांना राजकीय चिमटे काढल्याने चांगलीच रंगत आली. या कार्यक्रमात अमित शहा, चंद्रकांत खैरे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. संदीपान भुमरे एकाच व्यासपीठावर आले. कोपरखळ्यांना सुरूवात केली शहा यांनी. खैरे यांनी जरी माङो स्वागत केले नसले तरी मी त्यांचे स्वागत करण्यास तयार असल्याचे सांगून त्यांनी खैरेंना अप्रत्यक्ष निमंत्रणच दिले. त्यांनीही लगोलग खुलासा करताना मी कडवा शिवसैनिक असून, शिवसेना कदापिही सोडणार नाही, असे जाहीररीत्या सांगून शहा यांचे आवतन नाकारले. हा कारखाना शेतक:यांनी सेनेचे आमदार संदीपान भुमरे यांच्या ताब्यात दिला, असे सांगून खैरेंनी गुगली टाकली. त्याला उत्तर दानवेंनी दिले. हा कारखाना तुमचाच आहे. यात आम्ही ढवळाढवळ करणार नाही; मात्र, राज्य आम्ही चालवत आहोत, त्यात तुम्ही हस्तक्षेप करू नका, असा चिमटा दानवेंनी काढताच उपस्थितांत हास्याचे फवारे उडाल़े खा. खैरे व मी अनेक वर्षापासून सोबत आहोत. मी शहा यांच्या राजकीय स्पर्शाने मंत्री झालो. खैरे तुम्हीसुद्धा अमित शहांचे आशीर्वाद घ्या तुमचेसुद्धा सोने होईल, असे दानवे म्हणताच क्षणभर शांतता निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दानवे यांनी खैरे हे केंद्रात मंत्री होतीलच, असे म्हणून पुन्हा खळबळ उडवून दिली.
अमित शहा यांना ङोड प्लस सुरक्षा असल्याने व्यासपीठावर मोजक्याच व्यक्तींना प्रवेश होता; मात्र भाजपाचे काही हौशी पदाधिकारीही बसले. सुरक्षेच्या कारणावरून या पदाधिका:यांना खाली उतरविल्याने सेना-भाजपा कार्यकत्र्यात हमरीतुमरी झाली. (प्रतिनिधी)