पती-पत्नीच्या भांडणात पोलिसाचे फुटले डोके!

By Admin | Updated: December 27, 2016 01:05 IST2016-12-27T01:05:45+5:302016-12-27T01:05:45+5:30

पत्नीसोबत झालेल्या भांडणातून फाशी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच संबंधित व्यक्तीने दगड मारल्याने त्यांचे डोके फुटले.

Political divide between the husband and wife! | पती-पत्नीच्या भांडणात पोलिसाचे फुटले डोके!

पती-पत्नीच्या भांडणात पोलिसाचे फुटले डोके!

अहमदनगर : पत्नीसोबत झालेल्या भांडणातून फाशी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच संबंधित व्यक्तीने दगड मारल्याने त्यांचे डोके फुटले.
बाराबाभळी येथे रविवारी रात्री ही घटना घडली़ महेशनगर येथून सुकन्या गाडे यांचा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फोन आला़ आमचे भांडण झाले असून, माझे पती संतोष गाडे हे फाशी घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर, कॉन्स्टेबल योगीराज सोनवणे व गांगुर्डे हे घटनास्थळी दाखल झाले़ संतोष गाडे हा घरात गळफास लावून फाशी घेण्याचा प्रयत्न करत होता़ पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले़
मात्र, गाडे याने पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली़ गाडे याने
रस्त्यावरील दगड उचलून कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या डोक्यात मारला़ त्यात ते जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Political divide between the husband and wife!