शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पोलिओ लस १०० टक्के सुरक्षित!; दीपक सावंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 02:27 IST

सोमवारी शहर-उपनगरातील निवडक विभागांत लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहे. यात सर्वांनी न घाबरता सहभागी होऊन नवजात बालकांना पोलिओ लस द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मुंबई : गाझियाबाद येथील पोलिओ लसीच्या प्रकरणानंतर व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर पोलिओ डोस पाजू नका, अशा आशयाचे असंख्य मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र, हा पूर्णपणे चुकीचा संदेश असून राज्यातील पोलिओ लस १०० टक्के सुरक्षित असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे. सोमवारी शहर-उपनगरातील निवडक विभागांत लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहे. यात सर्वांनी न घाबरता सहभागी होऊन नवजात बालकांना पोलिओ लस द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.मुंबईत एल, एम-ईस्ट, के-ईस्ट आणि एस वॉर्डमधील एका परिसरात सोमवारी लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यात कुर्ला, गोवंडी, अंधेरी आणि भांडुप परिसराचा समावेश आहे, अशी माहिती पालिकेचे उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी दिली.ही लस सुरक्षित आहे, याउलट अशा संदेशांना बळी पडून जी बालके पोलिओ लसीपासून वंचित राहतील त्यांच्या आरोग्याला धोका संभवेल. त्यामुळे पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या पाल्यांना पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले.‘केंद्रासमवेत चर्चा करणार’शरीरामध्ये रोगप्रतिबंधक शक्ती तयार करण्यासाठी क्षीण व्हायरस या लसींमध्ये असतात. ते संबंधित आजाराविरुद्ध लढण्याची ताकद शरीरात निर्माण करतात, अशी माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिली. यासंदर्भात केंद्र शासनासोबत चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या कंपनीच्या पोलिओ लसींच्या उत्पादनात ‘टाइप टू’ विषाणू आढळला आहे, त्या बॅचचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही, असे केंद्र शासनाच्या लसीकरण विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :deepak sawantदीपक सावंतMaharashtraमहाराष्ट्र