शहर बससेवेसाठी लवकरच धोरण
By Admin | Updated: April 8, 2015 01:12 IST2015-04-08T01:12:43+5:302015-04-08T01:12:43+5:30
महापालिका क्षेत्रांमध्ये बससेवा सुरू करण्यासंदर्भात एक नवे धोरण लवकरच आखण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शहर बससेवेसाठी लवकरच धोरण
मुंबई : महापालिका क्षेत्रांमध्ये बससेवा सुरू करण्यासंदर्भात एक नवे धोरण लवकरच आखण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, एसटीकडून शहर बससेवेची परवानगी महापालिकेला दिली जाते पण त्यासाठी आवश्यक असे बसस्थानक आणि बसथांबे उपलब्ध करून दिले जात नाही. त्यामुळे योजना व्यवहार्य होत नाही. तसेच, शहर बससेवा सुरू करण्याची प्रक्रिया पारदर्शक नसते. नव्या धोरणाद्वारे योजना व्यवहार्य आणि पारदर्शक केली जाईल.
राज्यातील महापालिकांच्या शहरांमध्ये बससेवा सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाची स्वतंत्र कंपनी
सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील
यांनी केली. ही मागणी तपासून पाहिली जाईल आणि ती व्यवहार्य असल्यास ती स्वीकारली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
(विशेष प्रतिनिधी)