पीडित महिला-मुलींसाठी पोलिसांचा 'भरोसा सेल'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 17:32 IST2017-01-01T17:32:47+5:302017-01-01T17:32:47+5:30
हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलांना अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी भरोसा सेलमधून मानसिक बळ प्राप्त होईल

पीडित महिला-मुलींसाठी पोलिसांचा 'भरोसा सेल'
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 1 - हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलांना अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी भरोसा सेलमधून मानसिक बळ प्राप्त होईल, असा आपल्याला विश्वास आहे. त्यामुळे नागपूरसारखीच राज्यात इतर ठिकाणीही भरोसा सेलची निर्मिती करण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.
हैदराबादच्या धर्तीवर शहर पोलिसांनी राज्यातील पहिलेवहिले भरोसा सेल नागपुरातील सुभाषनगर टी पाइंटजवळ सुरू केले. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, विभागीय आयुक्त अनुप कुमार, सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त पाटनकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) रंजन कुमार शर्मा तसेच अनेक गणमान्य उपस्थित होते.