भांडण बायकांचे..मार पोलिसाला!
By Admin | Updated: June 13, 2014 14:54 IST2014-06-13T14:54:40+5:302014-06-13T14:54:40+5:30
घरगुती भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ३ पोलीस कर्मचार्यांपैकी एकास मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री ११.३0 च्या सुमारास घडली.

भांडण बायकांचे..मार पोलिसाला!
लई हाईट् झाली देवा : वट पौर्णिमेच्या रात्री तिघींचा 'मारयज्ञ'
जळगाव : स्टेशन रोडवरील देव हाईट्स या हॉटेलमध्ये घरगुती भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ३ पोलीस कर्मचार्यांपैकी एकास मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री ११.३0 च्या सुमारास घडली.
पूजा योगेश पंजवाणी (रा.पुणे, ह.मु. सिंधी कॉलनी) ही रडत शहर पोलीस स्टेशनला आली. देव हॉटेल्समध्ये मला मारहाण झाल्याची तक्रार तिने ठाणे अंमलदाराला दिली. त्याची खात्री करण्यासाठी ३ पोलीस कर्मचारी हॉटेलमध्ये गेले असता त्यापैकी महेंद्र राघो जाणे या कर्मचार्यास शिवीगाळ करून रम्पी पंजवाणी, जया पंजवाणी, आशा वरयाणी यांनी मारहाण केली, अशी फिर्याद महेंद्र जाणे यांनी दिली आहे.दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच मीडीयाच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. एका छायाचित्रकारास मारहाण करून त्याचा कॅमेराही फोडण्यात आल्याचे वृत्त आहे.या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेचे वृत्त कळताच हॉटेल परिसरात एकच गर्दी झाली होती.