पोलिसांचे काम 8 तासांचे करावे
By Admin | Updated: November 26, 2014 01:58 IST2014-11-26T01:58:14+5:302014-11-26T01:58:14+5:30
डय़ुटी 12 तासांऐवजी 8 तासांची होणो गरजेचे आहे, असे मत अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केले.

पोलिसांचे काम 8 तासांचे करावे
पुणो : पोलीस कर्मचारी 12 ते 14 तास काम करतात, मात्र तरीही नागरिक त्यांच्या कामाविषयी समाधानी नाहीत. पोलिसांकडून फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ होते तसेच ते नागरिकांशी व्यवस्थित बोलत नाहीत, असा आरोप होतो. पोलिसांमध्ये व्यावसायिकता येण्यासाठी त्यांच्या डय़ुटी 12 तासांऐवजी 8 तासांची होणो गरजेचे आहे, असे मत अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केले.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीआयडी) ‘वार्षिक गुन्हे अहवाल 2क्13’चे प्रकाशन बोरवणकर व पोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्या हस्ते झाले. बोरवणकर म्हणाल्या, यंदा पहिल्यांदाच सीआयडीच्या अहवालामध्ये पोलिसांवर येणारा कामाचा ताण आणि त्यामुळे झालेल्या आत्महत्या याचे विेषण केलेले आहे. पोलिसांच्या एकूण संख्येपैकी 41 टक्के पोलिसांनाच घरे मिळाली, उर्वरित पोलिसांठीही घरे उपलब्ध होणो आवश्यक आहे. पोलिसांकडून व्यावसायिकपणो कामाची अपेक्षा करताना या सुधारणाही गरजेच्या आहेत. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी आंतरसंबंध आहेत.
राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसून येते. दहा वर्षाच्या आतील 252 मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना गेल्या वर्षभरामध्ये घडल्या. सीआयडीकडून आकडेवारी एकत्रित करून त्याचे विेषण करण्याचा उद्देश, पोलिसांना तपासकामात मदत व्हावी हा आहे. सांख्यिकी हे मदतीसाठी असलेले टूल्स आहेत, मात्र त्याचा फार बागलबुवा होता कामा नये, असे बोरवणकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)