पोलीस साधणार थेट संवाद

By Admin | Updated: June 19, 2014 23:12 IST2014-06-19T23:12:40+5:302014-06-19T23:12:40+5:30

सोनसाखळी चोरटय़ांवर वचक ठेवण्यासाठी ठाणो पोलिसांनी ‘मोक्का’सारख्या कठोर कारवाईचा पवित्र हाती घेतला.

The police will direct the dialogue | पोलीस साधणार थेट संवाद

पोलीस साधणार थेट संवाद

>पंकज रोडेकर - ठाणो
सोनसाखळी चोरटय़ांवर वचक ठेवण्यासाठी ठाणो पोलिसांनी ‘मोक्का’सारख्या कठोर कारवाईचा पवित्र हाती घेतला. तरीसुद्धा सोनसाखळी चोरीच्या घटना कमी होत नाहीत. त्यामुळेच घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आता पोलिसांनी थेट नागरिकांशी संवाद साधून कशी खबरदारी घेतली पाहिजे याची माहिती त्यांना दिली जाणार आहे. तसेच या घटना रोखण्यासाठी  पथनाटय़ाद्वारे ठाणोकरांमध्ये जगजागृती करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रंनी दिली.  
घरफोडी आणि सोनसाखळीच्या घटना रोखणोही ठाणो पोलिसांपुढे मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यानुसार शहर पोलीस आयुक्तालय परिसरातील परिमंडळांतर्गत वरिष्ठ पोलीस अधिका:यांकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यातच सोनसाखळी चोरटय़ांवर नियंत्रण मिळण्यासाठी ठाणो पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन आणि मोक्कासारखी  कठोर कारवाई करण्यासही सुरुवात केली. या कारवाईत इराणी टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. तसेच वागळे इस्टेट परिमंडळात सशस्त्र पोलीस सकाळ-संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी तैनात केले. चोरटय़ांवर वचक ठेवताना स्थानिक पोलिसांद्वारे नागरिकांनाही वारंवार खबरदारी घेण्याच्या काही सूचना केल्या आहेत. मात्र, याबाबत जनजागृती कमी पडत असल्याने दररोज एक-दोन सोनसाखळी चोरीच्या घटना पोलीस ठाण्यात नोंदवल्या जात आहेत. ज्या ठिकाणी जास्त घटना घडल्या आहेत त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून  तेथे मॉर्निग वॉकसाठी येणा:या नागरिकांची पोलीस प्रत्यक्षात भेट घेणार असून त्यांच्याशी खबरदारीबाबत चर्चा करणार आहेत. तसेच चोरटय़ांची माहिती देणा:यांची नावेही गुप्त ठेवली जाणार आहेत.
2क्12 मध्ये पोलीस आयुक्तालय परिसरात सोनसाखळी हिसकावण्याच्या 574 घटना घडल्या होत्या.  
त्यातील 264 घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 2क्12 मध्येही 3 कोटी 88 लाख 28 हजार 47क् रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले. एक कोटी 14 लाख 7क् हजार 85क् रुपये किमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर  2क्13 या वर्षातील (जानेवारी-नोव्हेंबर) या 11 महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या  738 घटना घडल्या. त्यातील 348 घटना उघडकीस आल्या आहेत. 
या वर्षात चोरटय़ांनी एक कोटी 54 लाख 4क् हजार 38क् रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज खेचून धूम स्टाईलने पोबारा केला. तर 1 कोटी 27 लाख 16 हजार 44क् रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
या घटना रोखण्यासाठी नागरिकांशी संवाद वाढविणो गरजेचे आहे. त्यामुळेच हे अभियान हाती घेतले आहे. अशा वेळी कशी मदत करावी याचीही माहिती त्यांना दिली जाणार असून हे अभियान प्रभावी करण्यासाठी पथनाटय़ाद्वारे जनजागृती केली जाणार आहे.
- डॉ.रवींद्र सिंगल, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणो शहर
 
या ठिकाणी वाढल्या घटना
शहर परिमंडळातील - ठाणो महापालिका परिसर, मासुंदा तलाव परिसर, कळवा-खारीगावमधील दत्तवाडी, मुंब्य्रातील अमृतनगर
वागळे परिमंडळातील- खेवरा सर्कल, उपवन परिसर, मेंटल हॉस्पिटल परिसर, ब्रrांड आणि वाघबीळ

Web Title: The police will direct the dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.