धनंजय देसाईची पोलीस कोठडीत रवानगी
By Admin | Updated: June 21, 2014 00:27 IST2014-06-21T00:27:03+5:302014-06-21T00:27:03+5:30
धनंजय देसाई याला पोलीस कोठडी न देऊन प्रथमवर्ग न्यायालयाने चूक केल्याचे स्पष्ट करीत सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांनी देसाईला 24 जूनर्पयत पोलीस कोठडी सुनावली.

धनंजय देसाईची पोलीस कोठडीत रवानगी
>न्यायालयीन कोठडी रद्द : हडपसर खून प्रकरण
पुणो : हडपसर येथे झालेल्या तरुणाच्या खुनाप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याला पोलीस कोठडी न देऊन प्रथमवर्ग न्यायालयाने चूक केल्याचे स्पष्ट करीत सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांनी देसाईला 24 जूनर्पयत पोलीस कोठडी सुनावली.
आयटी इंजिनीअर मोहसीन शेख खुनाप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या देसाईसह 21 जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी इतर 2क् आरोपींकडे तपासासाठी पोलीस कोठडीची मुदत मिळाली. मात्र केवळ एकच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. देसाई हा हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष आहे आणि त्याने भावना चिथावणारी प्रक्षोभक भाषणोही केली होती.
कट रचून शेखचा खून करण्यातही देसाईचा सहभाग आहे. या प्रकरणी 12 जून रोजी देसाईची एक दिवसाची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. कॅन्टोन्मेट प्रथमवर्ग न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध असमाधान व्यक्त करीत पोलिसांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन दाखल केले आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पोलिसांचा रिव्हिीजन अर्ज मंजूर करून देसाईची पोलीस कोठडीत रवानगी केली़ (प्रतिनिधी)