पोलीस हवालदाराचा एकाला वाचवताना गेला जीव
By Admin | Updated: July 13, 2016 16:41 IST2016-07-13T16:41:43+5:302016-07-13T16:41:43+5:30
डोंबिवलीत वास्तव्याला असलेल्या 50 वर्षीय पोलीस हवालदार श्रीमंत डोंबाळे यांच्यावर काळानं घाला घातला आहे.

पोलीस हवालदाराचा एकाला वाचवताना गेला जीव
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 13 - डोंबिवलीत वास्तव्याला असलेल्या 50 वर्षीय पोलीस हवालदार श्रीमंत डोंबाळे यांच्यावर काळानं घाला घातला आहे. मुंब्रा आणि दिवा स्टेशनदरम्यान जखमी अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेल्या डोंबाळेंचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला आहे.
श्रीमंत डोंबाळे हे ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असून, डोंबिवलीतल्या निळजे येथे राहतात. विशेष म्हणजे ज्या माणसाला डोंबाळे वाचवण्यासाठी गेले होते. तो माणूस जिवंत असून, त्याच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबाळेंच्या मृत्यूमुळे ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये शोककळा पसरली आहे.