पोलिसांचे वाहन मनोरुग्णाने जाळले

By Admin | Updated: December 24, 2016 04:21 IST2016-12-24T04:21:06+5:302016-12-24T04:21:06+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात उभी असलेली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कार एका मनोरुग्णाने पेट्रोल

The police vehicle was burned by the psychiatrist | पोलिसांचे वाहन मनोरुग्णाने जाळले

पोलिसांचे वाहन मनोरुग्णाने जाळले

धुळे : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात उभी असलेली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कार एका मनोरुग्णाने पेट्रोल टाकून पेटवून दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली. गाडी पेटवून तेथून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या या रुग्णालया अटक करण्यात आली.
मनीष पुरुषोत्तम भोरसकर (४०) याने बाटलीत आणलेले पेट्रोल स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या गाडीवर टाकून त्याने ती गाडी पेटवून दिली. अग्निशमन दलाने १० मिनिटांत आग विझविली. याबाबत चालक विलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनिष याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४३५प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: The police vehicle was burned by the psychiatrist