महासंचालक आॅफिसात पोलीस बदल्यांचा खेळ

By Admin | Updated: June 23, 2014 03:34 IST2014-06-23T03:34:45+5:302014-06-23T03:34:45+5:30

राज्याचे पोलीस महासंचालक ‘स्वच्छ’ असले तरी त्यांच्या कार्यालयातही बदल्यांचा खेळ सुरू आहे. एकीकडे स्वेच्छेने बदल्या मागणाऱ्या अधिकाऱ्यांचे विनंती अर्ज फायलीतच अडकले आहेत

Police Transfers to DG Office | महासंचालक आॅफिसात पोलीस बदल्यांचा खेळ

महासंचालक आॅफिसात पोलीस बदल्यांचा खेळ

राजेश निस्ताने, यवतमाळ
राज्याचे पोलीस महासंचालक ‘स्वच्छ’ असले तरी त्यांच्या कार्यालयातही बदल्यांचा खेळ सुरू आहे. एकीकडे स्वेच्छेने बदल्या मागणाऱ्या अधिकाऱ्यांचे विनंती अर्ज फायलीतच अडकले आहेत तर दुसरीकडे राजकारणातील आबा-दादा-भाऊ-साहेब यांच्या एका फोनवर नियमावली गुंडाळून ठेवत बदल्यांचे आदेश फिरविले जात आहेत.
सुरुवातीला ताठर भूमिका घेणाऱ्या महासंचालक कार्यालयाने आता सरकारपुढे नमते धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. मुलांचे शिक्षण, स्वत:चा आजार, पत्नी, आई-वडिलांचा आजार, कौटुंबिक अडचणी यामुळे अनेक अधिकारी ठाणेदारकी, वरकमाईची ‘की-पोस्ट’ सोडून नियंत्रण कक्षात अथवा साईड ब्रँचला नोकरी करण्यास तयार आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या पोलीस प्रमुखामार्फत महासंचालकांना विनंती अर्जही पाठविले. परंतु महासंचालक कार्यालयातील कनिष्ठ यंत्रणा हेतुपुरस्सर हे अर्ज दडपून ठेवत आहेत. तर दुसरीकडे बदलीचा कायदा गुंडाळून सर्रास पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. त्यासाठी कक्ष अधिकारी व लिपिकवर्गीय यंत्रणा मोठी ‘उलाढाल’ करीत आहे.
राजकारणातील बड्या नेत्यांच्या नावाने पीए मंडळी आयपीएस अधिकाऱ्यांना फोन करतात, अप्रत्यक्ष धमकावतात आणि पाहिजे त्या अधिकाऱ्याची सोईच्या ठिकाणी नियुक्ती करून घेतात. (पान २ वर)

Web Title: Police Transfers to DG Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.