शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: ईडीच्या वसुली रॅकेटची पोलीस करणार चौकशी; संजय राऊत यांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 07:07 IST

शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत राऊत यांनी ईडीचे मुंबई व दिल्लीतील काही अधिकारी आपल्या वसुली एजंट मार्फत कोट्यवधींची वसुली करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्राप्तिकर विभाग आणि ईडीच्या माध्यमातून भाजपने चालविलेली भानामती शिवसेना उघड करेल. हा खंडणी उकळण्याचाच प्रकार असून या  वसुली रॅकेट विरोधात मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली असून लवकरच ईडीचे काही अधिकारी तुरूंगात असतील, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांनी मंगळवारी केला.

शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत राऊत यांनी ईडीचे मुंबई व दिल्लीतील काही अधिकारी आपल्या वसुली एजंट मार्फत कोट्यवधींची वसुली करत आहेत. ईडीच्या माजी संचालकांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते आता भाजपच्या तिकिटावर लखनऊमधून निवडणुक लढवीत आहेत. भाजपच्या ५० उमेदवारांचा खर्च त्यांनी केल्याची चर्चा असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी केला. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या खंडणीखोरीची संपूर्ण यादी मी पंतप्रधान कार्यालयात दिली आहे. २८ फेब्रुवारीला तेरा पानी पत्र पाठविले आहे, याकडे लक्ष वेधत मी पंतप्रधानांना आता फक्त एका भागाचीच माहिती दिली आहे. अशा दहा भागांची माहिती मी त्यांना देणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.

नवलानी वसुली एजंटजितेंद्र चंद्रलाल नवलानी ही व्यक्ती ईडीच्या अधिकाऱ्यांसाठी वसुलीचे काम करतो, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला. ईडीची कारवाई सुरू होताच नवलानींच्या कंपन्यांमध्ये कोट्यवधींची रक्कम जमा केली जाते. ज्या कंपन्या बँकेचे कर्जाचे पैसे देऊ शकत नाहीत त्या कंपन्या इडीची चौकशी सुरू होताच या खात्यांवर इतके पैसे का जमा करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय