पोलीस ठाण्यात महिला पीएसआयला धमकी
By Admin | Updated: December 30, 2016 20:57 IST2016-12-30T20:57:14+5:302016-12-30T20:57:14+5:30
एका २७ वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षकास पोलीस ठाण्यातच धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलीस ठाण्यात महिला पीएसआयला धमकी
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 30 - एका २७ वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षकास पोलीस ठाण्यातच धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री हिंगणा पोलीस ठाण्यात घडली. शशिकांत थोटे (३०, रा. हनुमाननगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार फिर्यादी महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती यावले या गुरुवारी रात्री ड्युटीवर हजर होत्या.
दरम्यान मारहाण प्रकरणातील आरोपींना पोलीस ठाण्यात घेऊन आले. अधिकारी गुन्हा दाखल करीत असताना आरोपी थोटे हा ठाण्यात पोहोचला. त्याने स्वत:ला राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगत धमकावणे सुरू केले.
त्यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न करीत शांत राहण्याची ताकीद दिली. यावर आरोपीने पीएसआय स्वाती यांच्याशी वाद घातला आणि पाहून घेण्याची धमकी दिली. आरोपीच्या विरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.