शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पूजा चव्हाण मृत्युप्रकरणी पोलीस पथक यवतमाळात, पाच सदस्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 02:02 IST

Pooja Chavan suicide case : पुणे येथील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूजा चव्हाण (२२, रा. परळी, जि. बीड) या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

यवतमाळ : पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणात सोमवारी पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच सदस्यीय पथक यवतमाळात धडकले. पूजावर येथे उपचार झाले का, हे तपासण्यासाठी या पथकाने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन अधिष्ठाता डाॅ. मिलिंद कांबळे यांचा जबाब नोंदविला.पुणे येथील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूजा चव्हाण (२२, रा. परळी, जि. बीड) या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणाची तार थेट यवतमाळशी जुळलेले असल्याचे चर्चिले गेले. पूजावर यवतमाळात उपचार केले गेल्याचाही संशय पोलिसांना आहे. याच अनुषंगाने तपास करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक जयंत जाधव यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक सोमवारी यवतमाळात येऊन गेले. या पथकाने दिवसभर शासकीय रुग्णालय परिसराची बारकाईने पाहणी केली. यंत्रणेकडून काही धागा मिळतो का, या दृष्टीने चाचपणी केली. अधिष्ठाता डाॅ. मिलिंद कांबळे यांना संबंधित घटनेच्या माहितीबाबत सूचनापत्र दिले. पूजा हिचे नाव बदलवून तर उपचार करण्यात आला नाही ना, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत. पुणे पोलिसांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांकडे १ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत पूजा चव्हाण नावाच्या मुलीने स्रीरोग विभागात ट्रिटमेंट घेतली काय, याची लिखित माहिती मागितल्याचेही सांगितले जाते. या पथकाने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशीही या प्रकरणी चर्चा करून आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.

मध्यरात्री ‘एचएमआयएस’ कक्ष का उघडला?- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपचारार्थ दाखल रुग्णांची नोंद एचएमआयएस (हाॅस्पिटल मॅनेजमेंट इंटिग्रेटेड सिस्टिम) प्रणालीवर घेतली जाते. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा संदर्भ येताच येथेही हालचाली सुरू झाल्या. - शनिवारी मध्यरात्रीनंतर एचएमआयएस कक्ष उघडण्यात आला. इतक्या रात्री हा कक्ष उघडण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. - त्याबाबत तेथील यंत्रणेत वेगवेगळे अंदाज वर्तविले जात असून, कक्ष उघडण्याच्या घटनेकडे साशंकतेने पाहिले जात आहे. कक्ष उघडण्याचा हा प्रकार पुणे ग्रामीण पोलिसांसाठी तपासाचा धागा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाण