पानसरे हत्या प्रकरणी पोलीस पथके रिक्त हस्ते परतली
By Admin | Updated: July 17, 2015 04:17 IST2015-07-17T04:17:16+5:302015-07-17T04:17:16+5:30
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी विविध राज्यांत पाठविण्यात आलेली पोलीस पथके रिकाम्या हाताने परतली आहेत.

पानसरे हत्या प्रकरणी पोलीस पथके रिक्त हस्ते परतली
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी विविध राज्यांत पाठविण्यात आलेली पोलीस पथके रिकाम्या हाताने परतली आहेत. गेल्या सहा महिन्यांत या पथकांच्या हाती कोणतेच ठोस पुरावे लागलेले नाहीत. सध्या चार प्रमुख पथके स्थानिक स्तरावर, तर एक विशेष पथक नवी मुंबई येथे काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याप्रकरणी सात पथकांना स्वतंत्रपणे काम दिले होते. गेली तीन महिने ही पथके गोवा, कर्नाटकसह अन्य राज्यांत तळ ठोकून होती. मात्र कोणतेही महत्त्वाचे धागेदोरे न मिळाल्याने ही पथके रिकाम्या हाताने परतली आहेत. (प्रतिनिधी)
काही दिवसांपूर्वी मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कोणत्या स्तरावर तपास करायचा, या नियोजनानुसार तपास सुरू आहे.
- संजयकुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण