पोलीस भरती सुनावणी तीन आठवडय़ांनी
By Admin | Updated: July 13, 2014 02:08 IST2014-07-13T02:08:10+5:302014-07-13T02:08:10+5:30
याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्यास उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना अजून तीन आठवडय़ांची मुदत दिली़

पोलीस भरती सुनावणी तीन आठवडय़ांनी
मुंबई : पोलीस भरतीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करणा:या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्यास उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना अजून तीन आठवडय़ांची मुदत दिली़
याप्रकरणी ऑल महाराष्ट्र ह्युमन राइट्स वेलफेअर असोसिएशनने न्यायालयाला पत्र लिहिले होत़े या भरती प्रकियेत मैदानी चाचणीत पाच जणांचा बळी गेला़ भरतीसाठी मुंबईत आलेल्या उमेदवारांना पाणी, जेवण, शौचालय व राहण्याची सोय शासनाने केली नाही़
त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेसाठी नियमावली तयार करावी व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समितीही असावी़ तसेच यंदाच्या भरती प्रक्रियेत बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या
पत्रत करण्यात आली होती़ त्याची दखल घेत न्यायालयाने या पत्रचे सुओमोटो जनहित याचिकेत रूपांतर करून घेतल़े
पोलीस आयुक्त मारिया यांनी याचे प्रत्युत्तर सादर न केल्याने न्यायालयाने यास अजून तीन आठवडय़ांची मुदत देत ही सुनावणी तहकूब केली़ (प्रतिनिधी)