त्या गरोदर महिलेच्या मदतीला पोलिस धावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 21:39 IST2016-08-23T21:39:34+5:302016-08-23T21:39:34+5:30
सावंतवाडीत येत उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान केले. त्यांनी दाखवलेल्या माणुसकीने सौ.उर्मिला पवार यांना जीवनदान मिळाले.

त्या गरोदर महिलेच्या मदतीला पोलिस धावला
ऑनलाइन लोकमत
सावंतवाडी, दि. २३ :जिल्हयातील सावंतवाडी पारपोली येथिल सौ.उर्मिला उमेश पवार या महिलेला प्रसूतीकरता AB निगेटीव्ह या लाखात एक मिळणाऱ्या रक्ता गटाची अत्यंत गरज असतांना नेहमी दुसर्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या माजी.जिल्हापरीषद आरोग्य व शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी व्हॉटस्अपच्या माध्यमातून रक्तदात्यांना आवाहन केले.याला प्रतिसाद देत देवगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शिवनाथ उबाळे रा. धुळे व सावंतवाडी माठेवाडा येथे राहणाऱ्या कृपा कृपाल सावंत यांनी रक्त देण्याची तयारी दाखवली आणि स्वताहून सावंतवाडीत येत उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान केले. त्यांनी दाखवलेल्या माणुसकीने सौ.उर्मिला पवार यांना जीवनदान मिळाले.
श्री तळवणेकर यांनी दोन्ही रक्तदात्यांचा सावंतवाडीच्या राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी प्रसाद कोळंबेकर, काशिनाथ दुबाषी,कृणाल सावंत,उमेश पवार, रुपेश हिराप आदि उपस्थित होते. दरम्यान व्हॉटस्अपच्यामाध्यमातून रक्तदात्यांना आवाहन करण्यात आल्यावर रमेश गावडे ओटवणे, राजेश नार्वेकर रत्नागिरी,दत्तात्रय दाभोलकर ओरस,महेश पाटील सावंतवाडी यांनी रक्त देण्याची तयारी दर्शविली होती