ठाण्यातील बारवर पोलिसांची धाड

By Admin | Updated: April 20, 2015 02:30 IST2015-04-20T02:30:55+5:302015-04-20T02:30:55+5:30

आराधना सिनेमाजवळील ‘शिल्पा’ बारमध्ये नौपाडा पोलिसांनी शनिवारी रात्री धाड टाकून अश्लिल नृत्य करणाऱ्या १६ बारबालांसह २५ जणांना अटक केली

Police raid on Thane bar | ठाण्यातील बारवर पोलिसांची धाड

ठाण्यातील बारवर पोलिसांची धाड

ठाणे : आराधना सिनेमाजवळील ‘शिल्पा’ बारमध्ये नौपाडा पोलिसांनी शनिवारी रात्री धाड टाकून अश्लिल नृत्य करणाऱ्या १६ बारबालांसह २५ जणांना अटक केली. तसेच या ठिकाणाहून १५ हजारांची रोकडही जप्त करण्यात आली.
बार व्यवस्थापक सुरेंद्र साहू याच्या संगनमताने बारमधील गिऱ्हाइकांना आकर्षित करण्यासाठी या बारबाला बीभत्स हावभाव करीत गाण्यांवर थिरकत होत्या. त्याचदरम्यान १८ एप्रिल रोजी रात्री ९ वा.च्या दरम्यान नौपाडा पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने या ठिकाणी छापा टाकला. त्या वेळी त्यांच्यावर अश्लील हावभाव करून सात ते आठ गिऱ्हाईक नोटांची उधळण करीत होते. रात्री ११.३० पर्यंत चाललेल्या या धाडसत्रात व्यवस्थापकासह २५ जणांना पोलिसांनी अटक केली. तसेच या ठिकाणाहून १५ हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.
याप्रकरणी उपनिरीक्षक तृप्ती खळदे यांनी गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक शिशुपाल हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Police raid on Thane bar