हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

By Admin | Updated: July 5, 2015 02:23 IST2015-07-05T02:23:51+5:302015-07-05T02:23:51+5:30

दक्षिण मुंबईतील इंटरकॉन्टिनेन्टल या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेला हायप्रोफाइल जुगाराचा अड्डा पोलिसांच्या समाजसेवा शाखेने उद्ध्वस्त केला. हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री धाड घालून

Police raid on Highprofile gambling stand | हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

मुंबई : दक्षिण मुंबईतील इंटरकॉन्टिनेन्टल या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेला हायप्रोफाइल जुगाराचा अड्डा पोलिसांच्या समाजसेवा शाखेने उद्ध्वस्त केला. हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री धाड घालून हा अड्डा चालवणाऱ्या दोघांसह एकूण १५ जणांना पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलिसांनी साडेचार लाखांची रोकड हस्तगत केली. अटक झालेल्यांत बड्या व्यावसायिकांचा समावेश असल्याचे समाजसेवा शाखेकडून सांगण्यात आले.
मरिन ड्राइव्ह परिसरातील इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील खोली नंबर ३३३ मध्ये हायप्रोफाइल जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार समाजसेवा शाखेने रात्री बाराच्या सुमारास हॉटेलच्या संबंधित रूममध्ये धाड घातली. तेव्हा रूममधील गोलाकार टेबलवर बसून सहा जण जुगार खेळत होते तर सहा जण प्रतीक्षेत होते. टेबलवर पैशांऐवजी कॉइन्स आढळली. या जुगाऱ्यांसह मुकेश जोशी, लंकेश मुनोत आणि भरत जैन या अड्डाचालकांना गजाआड करण्यात आले.

Web Title: Police raid on Highprofile gambling stand