अकोल्यात सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By Admin | Updated: October 27, 2016 00:52 IST2016-10-27T00:52:26+5:302016-10-27T00:52:26+5:30

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी सुरू असलेल्या सामन्यावर सिंधी कॅम्प येथे सट्टा सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला.या ठिकाणावरून दोन जणांना ताब्यात घेण्यात

Police raid in betting at Akota | अकोल्यात सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा

अकोल्यात सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि.27 - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी सुरू असलेल्या सामन्यावर सिंधी कॅम्प येथे सट्टा सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला.या ठिकाणावरून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत खदान पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सिंधी कॅम्प परिसरात आसिफ खान आणि जयेश बजाज हे दोघे भारत आणि न्यूझीलंड सामन्यावर सट्टा चालवित असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना मिळाली. त्यांनी पथकासह क्रिकेट सट्ट्यावर छापा टाकला. या ठिकाणावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. दोघांकडून पोलिसांनी एक लॅपटॉप व दोन मोबाइल जप्त केले. ताब्यात घेतलेल्या दोघांविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Police raid in betting at Akota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.