श्रीपाल सबनीस यांनी मागितले पोलीस संरक्षण
By Admin | Updated: January 5, 2016 03:09 IST2016-01-05T03:09:39+5:302016-01-05T03:09:39+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या विधानावरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पोलीस आयुक्त

श्रीपाल सबनीस यांनी मागितले पोलीस संरक्षण
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या विधानावरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांची सोमवारी भेट घेऊन पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. आपल्यासह कुटुंबियांना धमक्या येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिल्यावर आयुक्त संरक्षण देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सबनीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात एका व्याख्यानमालेमध्ये श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांचा एकेरी नामोल्लेख केला होता. तसेच भाषणातील काही मुद्यांवरुन तीव्र पडसाद उमटले होते. याचा भाजपा कार्यकर्त्यांनी निषेधही व्यक्त केला होता. उमरगा येथे कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी दिली. याबाबत उस्मानाबाद पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.