शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिग्दर्शक रोहित शेट्टीला पोलिस संरक्षण; "आंतरराष्ट्रीय गँगविरुद्ध कठोर कारवाई" - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:50 IST

आंतरराष्ट्रीय गँगविरोधातील कारवाई तीव्र गतीने सुरू असून, कुठल्याही परिस्थितीत मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

 

मुंबई :  दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टॉवर निवासस्थानाजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली आहे. तर, रोहित शेट्टीला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. या प्रकरणी बिष्णोई गँगचा ऑपरेटर शुभम लोणकरच्या भावालाही अटक केली असून, परदेशात पळून गेलेल्या शुभमचा कसून शोध घेतला जात आहे. आंतरराष्ट्रीय गँगविरोधातील कारवाई तीव्र गतीने सुरू असून, कुठल्याही परिस्थितीत मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

उद्धवसेनेचे आ. मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर समाधानकारक आहे. स्वतः दोनदा शेट्टी यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली असे नमूद केले. आ. सचिन अहिर यांनी वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे मुंबईकर, विशेषतः सिने कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय गँगविरोधात ठोस उपाययोजनांची मागणी केली.

शुभम परदेशातून फोनद्वारे करतोय कारवाया...मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, एका इसमाने भिंतीलगत पिस्तूल चालवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी मिळालेल्या स्कुटीच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपींना अटक केली.

या तपासातून मुंबई पोलिसांचे प्रोफेशनॅलिझम अधोरेखित झाले. शुभम हा परदेशातून फोनद्वारे कारवाया करत आहे. काँग्रेस व भाजप आमदारांनाही त्याने धमकीचे फोन केले. पण, त्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाही.

...म्हणून सेलिब्रेटींना पोलिस संरक्षणराष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या अनमोल बिष्णोईची कस्टडी मुंबई पोलिसांना देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. एनआयए कायद्यानुसार आरोपीला पोलिस कोठडी मिळत असल्याने त्यांच्या कारवाईनंतर मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. धमकीचे कॉल आल्यावर सेलिब्रेटी अधिक घाबरतात त्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण दिले जाते. मात्र, मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई ही राज्याची राजधानी असली तरी देशाचीही आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईला कसल्याही परिस्थितीत गँगवॉरकडे जाऊ देणार नाही, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे अशा पद्धतीची रॅकेट समूळ नष्ट केली जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ठणकावून सांगितले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Shetty gets police protection after shooting; crackdown on gangs.

Web Summary : Director Rohit Shetty receives police protection after a shooting near his residence. Twelve arrested, linked to Bishnoi gang. CM Fadnavis vows to prevent gang wars in Mumbai, intensifying action against international criminal networks.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाRohit Shettyरोहित शेट्टी