शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

धक्कादायक! हल्लेखोर रेती माफियांसोबत पोलिसांची चक्क सामिष पार्टी; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 08:48 IST

पोलीस म्हणतो, तुमसरला असताना उडविली अनेक आरोपींची नावे

भंडारा :  उपविभागीय अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या रेती तस्करांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांची रेती तस्करांसोबत चक्क सामिष पार्टी रंगल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. तुमसर ठाण्यात असताना अनेक आरोपींची नावे उडविली, ही तर किरकोळ बाब आहे, असे पवनी पोलीस ठाण्यात कार्यरत एक हवालदार रेती तस्करांना सांगताना या  व्हिडिओत दिसतो. ही पार्टी उमरेडजवळील एका ढाब्यावर बुधवारी दुपारनंतर झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, सामिष पार्टी करणाऱ्या पवनी ठाण्याच्या त्या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले. पोलीस हवालदार दिलीप धावडे, पोलीस शिपाई सुशांत कोचे आणि राजेंद्र लांबट अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर बुधवारी पहाटे ३.३० वाजता १५ ते २० रेती तस्करांनी हल्ला केला होता. त्यानंतर पवनी पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले. त्यातील एक पथक त्याच रेती तस्करांसोबत सामिष पार्टी करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

या व्हिडीओमध्ये एका ढाब्यावर पार्टी सुरू असून, पोलीस आपल्या ‘कर्तृत्वा’चा पाढा तस्करांसमोर वाचत असल्याचे दिसते. ‘आपण कशी मदत करतो हे, तुम्हाला तर माहीतच आहे. तुमसरमध्ये आरोपींची नावे उडवून टाकली होती. हे तर काहीच नाही, किरकोळ बाब आहे,’ असे सांगत हवालदार थेट आयजींचे नाव घेतो. दिलीप धावडे असे त्याचे नाव असून, तो सहा महिन्यांपूर्वी तुमसरहून पवनी येथे बदली होऊन आला असून, सध्या वाहतूक शाखेत कार्यरत आहे. या पार्टीत किशोर पंचभाई यांच्यासह हल्ला प्रकरणातील आरोपी राजू मेंगरे दिसत आहे. तर कोचे, लांबट हे पोलीस कर्मचारी ताव मारताना दिसत आहेत. दरम्यान, हल्ला करणाऱ्या तीन रेती तस्करांना पवनी पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

दोषींवर कडक कारवाई करा - आ. भोंडेकर एसडीओंवर हल्ला करण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. हल्लेखोर आरोपींचा शोध घेऊन तत्काळ कारवाई करावी, या मागणीचे पत्र आपण गृहमंत्र्यांना पाठविले आहे. रेती तस्करांची हिंमत वाढत असून, आता तर आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांनी चक्क रेती तस्करांसोबत पार्टीच केल्याचे उघड हाेत आहे. यावर आपण शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सर्व महिती देणार असल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.

सामिष पार्टी करणारे तीन पोलीस निलंबितएसडीओंच्या पथकावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांसोबतच पोलिसांनी सामिष पार्टी करणे हा प्रकार अत्यंत बेजबाबदारपणाचा असून, पोलीस खात्याला अशोभनीय असे वर्तन आहे. पोलीस खात्याची प्रतिमा त्यामुळे मलिन झाली आहे, असे तिघांच्या निलंबनाचा आदेश जारी करताना पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी म्हटले आहे.