पीडितांवर पोलिसांची दहशत

By Admin | Updated: November 26, 2014 01:49 IST2014-11-26T01:49:58+5:302014-11-26T01:49:58+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी हत्याकांडात पोलीस फिर्यादी कुटुंबालाच गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक खुलासा जाधव कुटुंबाने केला आहे.

Police panic on victims | पीडितांवर पोलिसांची दहशत

पीडितांवर पोलिसांची दहशत

पाथर्डी हत्याकांड : जाधव कुटुंबीयांचा धक्कादायक खुलासा
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी हत्याकांडात पोलीस फिर्यादी कुटुंबालाच गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक खुलासा जाधव कुटुंबाने केला आहे. या प्रकरणात मृत्यू पावलेल्या संजय जाधव, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या हत्येची खोटी कबुली देण्यास पोलीस प्रवृत्त करत असल्याचा आरोप खुद्द संजयची आई साखराबाई जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
संजयच्या कुटुंबासोबत त्याचे तीन भाऊ, नातू आणि नातसुना गुण्यागोविंदाने राहत असल्याचा दावा साखराबाई यांनी केला आहे. साखराबाई म्हणाल्या, ‘कुटुंबात मतभेद असल्याचा खोटा आरोप करत पोलीस संपूर्ण कुटुंबाचा मानसिक छळ करत आहेत. सुनांना व नातसुनांना रात्री-अपरात्री पोलीस ठाण्यात बोलावले जाते.  ‘पोलिसांनी त्रस देणो थांबवले नाही, तर सरकारच्या दारातच संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या करेन’, असा इशारा साखराबाई यांनी दिला आहे.
मृत पावलेल्या सुनीलचा अँड्रोईड मोबाईल घटना घडल्यानंतर गायब आहे. त्याचा शोध घेतल्यास पोलिसांना खुनाची उकल आपोआप होईल, असा दावा जाधव कुटुंबाने केला आहे. मात्र राजकीय दबावामुळे पोलिसांनी एकतर्फी तपास सुरू केल्याने योग्य तपास होणो अवघड वाटत असल्याची प्रतिक्रिया जाधव कुटुंबाने व्यक्त केली.  (प्रतिनिधी)
 
‘..म्हणून पोलीस मला गोवत आहेत!’
च्अमहदनगर जिल्ह्यात प्रत्येक महिन्यात सवर्णीयांकडून दलितांची हत्या होत आहे. मात्र प्रत्येकवेळी प्रकरण दडपले जात आहे. जाधव कुटुंबाच्या हत्येचे प्रकरण माध्यमांमार्फत प्रकाशझोतात आणल्याने पोलीस जाणीवपूर्वक आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संजयचे मामेभाऊ नाथाभाऊ अल्लाड यांनी केला आहे.
 
‘त्यांच्याही शरीराचे तुकडे करा!’
च्जाधव कुटुंबाच्या हत्येत संजय व मुलगा सुनील याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आहेत. त्यामुळे ‘सरकारने ख:या आरोपींना तत्काळ पकडून त्यांच्याही शरीराचे तसेच तुकडे करावे,’ अशी मागणी संजयची आई व सुनीलची आजी साखराबाई जाधव यांनी केली आहे. 
 
‘एक लाख रुपयांसह नावे घ्या!’
‘एका वरिष्ठ अधिका:याने इतर अधिका:यांसमोर पोलीस ठाण्यातच एक लाख रुपये घ्या, आणि कुटुंबातील दोन व्यक्तींची नावे घ्या,’ असे आमिष दाखविल्याचा आरोप संजयचा मोठा भाऊ दिलीप जाधव यांनी केला आहे.
 
फिर्यादींच्याच तपासण्या!
रिपाइं(सेक्युलर)चे अध्यक्ष श्याम गायकवाड यांनी स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे पोलीस योग्य तपास करीत नसल्याचा आरोप केला. कुटुंबातील फिर्यादी व्यक्तींचीच नार्को, लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग अशा वेगवेगळ्या फॉरेन्सिक टेस्ट करून पोलीस यंत्रणा ख:या आरोपींकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे स्थानिक तपास यंत्रणा बदलून हे प्रकरण सीबीआय या स्वतंत्र यंत्रणोकडे देण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.
 
गुन्हा कबूल करा, नाहीतर..
‘गुन्हा कबूल करा, नाहीतर संपूर्ण कुटुंबाला तिघेरी हत्याकांडाच्या कटात गोवू’, असा सज्जड दम पोलीस अधिकारी देत असल्याचा आरोप संजय यांचा लहान भाऊ रवींद्र जाधव यांनी केला आहे.
 
भीमशक्तीचा मोर्चा
भीमशक्ती संघटनेतर्फे मंगळवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो आंबेडकरी कार्यकत्र्यानी काळ्य़ा फिती बांधून रोष व्यक्त केला.
दरम्यान आमदार भाई जगताप यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली. भाई जगताप म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खातेवाटप आणि मंत्रिपदाच्या चर्चेसाठी महिन्याभरात बारा वेळा दिल्लीला गेले. मात्र एकदाही त्यांना पाथर्डी येथे भेट देणो आवश्यक वाटले नाही.’  
या हत्याकांडाची सीबीआय चौकशीची मागणी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दलितांवरील हल्ल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी म्हणून येथील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणीही हंडोरे यांनी केली आहे.

 

Web Title: Police panic on victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.