पोलीस अधिकाऱ्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: May 11, 2017 02:44 IST2017-05-11T02:44:48+5:302017-05-11T02:44:48+5:30

न्यायालयाच्या आदेशाने वडाळा पोलीस ठाण्याचे पूर्वीचे वरिष्ठ निरीक्षक सुहास गरु ड यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police officer, 15 others booked | पोलीस अधिकाऱ्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस अधिकाऱ्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मनीषा म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : न्यायालयाच्या आदेशाने वडाळा पोलीस ठाण्याचे पूर्वीचे वरिष्ठ निरीक्षक सुहास गरुड यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईच्या नावाखाली व्हिडीओ पार्लरमधील ऐवज लुटल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
वडाळा टी टी परिसरातील व्यावसायिक संजय सोनी यांच्या पार्लरवर गेल्या वर्षी गरु ड यांच्या नेतृत्त्वाखाली कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी दागिने आणि ५0 हजार रूपयांच्या रोकडवर डल्ला मारला. आणि तेथून निघून गेले. मात्र या कारवाईची साधी नोंद देखील करण्यात आलेली नाही. याबाबत सोनी यांनी कारवाईबाबत पोलिसांकडे विचारणा केली. मात्र पोलिसांनी त्यांना उडवाउडवीची उत्तर देत परत पाठविले. त्यामुळे सोनी यांनी विशेष सत्र न्यायालयात धाव घेत चौकशीची मागणी केली होती.

Web Title: Police officer, 15 others booked