अमेय खोपकरांना पोलिसांची नोटीस
By Admin | Updated: March 15, 2017 13:17 IST2017-03-15T13:17:51+5:302017-03-15T13:17:51+5:30
शिवजयंतीनिमत्त दादरमधील शिवाजी पार्क परिसरात ढोलताशे वाजवल्यामुळे अमेय खोपकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे

अमेय खोपकरांना पोलिसांची नोटीस
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. शिवजयंतीनिमत्त दादरमधील शिवाजी पार्क परिसरात ढोलताशे वाजवल्यामुळे अमेय खोपकर यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. सकाळी 9.30 वाजल्यापासून शिवजयंतीनिमित्त शिवाजी पार्क परिसरात ढोलताशे वाजत होते. शिवाजी पार्क शांतता परिसर म्हणून घोषित असून नियमांचं उल्लंघन केल्यांने ही नोटीस बजावण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
शिवजयंतीनिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली जाणार होती. यानिमित्त ढोलताशे मागवण्यात आले होते. ढोलताशांच्या आवाजामुळे झालेल्या नियमांचं उल्लंघन पाहता पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे.
अमेय खोपकर यांनी मात्र 'मी या नोटिशीला घाबरत नाही. अशा अनेक नोटिसा मला आल्या आहेत. सरकारला ही नोटीस पाठवताना काहीतरी वाटायला हवं. तुम्ही शिवजयंतीला अशी नोटीस पाठवता?', असं म्हणत सरकारवर टीका केली आहे.