पोलिसानेच केला मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: July 23, 2016 02:39 IST2016-07-23T02:39:01+5:302016-07-23T02:39:01+5:30
हुंडा मिळत नसल्याने अल्पवयीन मुलीशी ठरलेला साखरपुडा मोडणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने त्या मुलीला घरी बोलवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसानेच केला मुलीचा विनयभंग
कल्याण : हुंडा मिळत नसल्याने अल्पवयीन मुलीशी ठरलेला साखरपुडा मोडणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने त्या मुलीला घरी बोलवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे, मुलीची आईही पोलीस दलात कार्यरत आहे.
तक्रारदार मुलगी बिर्ला कॉलेज परिसरात राहते. काही महिन्यांपूर्वी तिचे लग्न मुंबई पोलीस दलातील शरद ठाकूर (रा. नांदिवली) याच्याशी ठरले होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र, त्यानंतर शरद आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांकडे पाच तोळे सोने व मोटारसायकलची मागणी केली. तिच्या कुटुंबीयांनी हुंडा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे संतापलेल्या शरदने चक्क ठरलेले लग्न मोडले. काही दिवसांपूर्वी मुलीला आईची तब्येत खराब असल्याचे खोटे कारण देत घरी बोलवले. तेथे तिचा विनयभंग केला. तिने या प्रकाराबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)