पोलिस कर्मचार्याने केला युवतीचा विनयभंग
By Admin | Updated: July 10, 2014 23:06 IST2014-07-10T23:06:33+5:302014-07-10T23:06:33+5:30
चिडीमार पथकात कार्यरत असलेला पोलिस कर्मचार्याने एका तरुणीला जबरदस्तीने ग्राऊंडवर नेऊन विनयभंग केला.

पोलिस कर्मचार्याने केला युवतीचा विनयभंग
बुलडाणा : येथील पोलिस स्टेशनमध्ये चिडीमार पथकात कार्यरत असलेला विष्णू गाडेकर याने आपल्याच नात्यातील एका तरुणीला जबरदस्तीने जिजामाता महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर नेऊन तिचा विनयभंग केला, अशा आशयाची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे पीडित मुलीने केली आहे.
पीडित मुलगी पारध येथे शिक्षण घेत असून, बुलडाणा येथील चिंचोले चौकात मैत्रिणीसोबत राहते. तिच्या आई-वडिलाने नातेसंबंधात असलेल्या पोलिस कर्मचारी विष्णू गाडेकर याच्याकडे तिची जबाबदारी सोपवली. ७ जुलै रोजी रात्री पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसह आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये जात असताना गाडेकर याने तिला भररस्त्यातून जबरदस्तीने गाडीवर बसवून जिजामाता महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर नेऊन तिचा विनयभंग केला.
या दरम्यान पीडित मुलीने घटनास्थाळाहून पळ काढत स्थानिक बसस्थानक गाठले. गाडेकर याच्या भीतीपोटी ती बसने चिखलीला गेली आणि पुढे देऊळगावराजा गाठून तेथे रात्र बसस्थानकावर काढली. सकाळी तिने आपल्या आई-वडिलाला फोन करून सर्व हकिगत सांगितली, असे तक्रारीत पीडित मुलीने म्हटले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या चिडीमार पथकात कार्यरत गाडेकर याने भररस्त्यातून मुलीला उचलून तिचा विनयभंग केला. ही पोलिस विभागाला काळिमा फासणारी घटना आहे. त्यामुळे सदर पोलिस कर्मचार्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड तसेच पीडित मुलीच्या आई-वडिलाने १0 जुलै रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन केली आहे.
** तो पोलिस कर्मचारी निलंबित
पोलिसांच्या चिडीमार पथकात कार्यरत गाडेकर याने भररस्त्यातून मला उचलून नेऊन विनयभंग केला, अशी तक्रार पीडित मुलीने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली होती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस कॉस्टेबल विष्णू गाडेकर याला तत्काळ निलंबित करण्यात आले असून, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शामराव दिघावकर यांनी दिली.