ब्रीच कॅण्डी येथील अनधिकृत बांधकामाची पोलिसांकडून दखल

By Admin | Updated: April 30, 2016 02:20 IST2016-04-30T02:20:31+5:302016-04-30T02:20:31+5:30

अनधिकृत बांधकाम आढळल्यास एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्याबाबतचे पत्र डी वॉर्डच्या साहाय्यक महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

Police interrogate unauthorized construction of Breach Kandy | ब्रीच कॅण्डी येथील अनधिकृत बांधकामाची पोलिसांकडून दखल

ब्रीच कॅण्डी येथील अनधिकृत बांधकामाची पोलिसांकडून दखल

मुंबई : भुलाभाई देसाई रोडवर ब्रीच कॅण्डी येथील सीटीएस क्रमांक ७६४ या भूखंडावर झालेल्या अनधिकृत बांधकामाची दखल घेत मुंबई पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तेथे अनधिकृत बांधकाम आढळल्यास एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्याबाबतचे पत्र डी वॉर्डच्या साहाय्यक महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. त्याचप्रमाणे अग्निशमन दलालाही या उल्लंघनाबाबत पाहणी करण्याचे कळवण्यात आले आहे.
मलबार हिल विभागातील या बांधकामात तब्बल ३१ हजार ११९ चौ. फुटांचा एफएसआय घोटाळा झाला असून त्यात महापालिका अधिकारी सामील असल्याची तक्रार करणारे निवेदन जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष
मानव जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते.
हा घोटाळा २00 कोटींचा असून त्यामुळे राज्य सरकार आणि महापालिकेचा महसूल बुडाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घोटाळ्यात इमारत प्रस्ताव विभागाचे अधिकारी सामील असल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी जोशी यांनी केली आहे.
प्रत्येक मजल्यावर २,८२९ चौ. फूट याप्रमाणे अकरा मजल्यांवर एकूण ३१ हजार ११९ चौ. फुटांचा हा
घोटाळा असून या आराखड्यात झालेले बदल आणि अनियमितता याचीही माहिती निवेदनात देण्यात आली आहे.
महापालिकेकडून स्थानिक पोलिसांना अनधिकृत बांधकामांची माहिती देऊन कारवाई करण्याची सूचना केली जाते. मात्र या प्रकरणात पोलिसांनीच महापालिका अधिकाऱ्यांना पाहणी करण्याबाबत पत्र पाठवले आहे. आता यापुढे पालिका काय पावले उचलते हे पाहणे गरजेचे ठरेल. (प्रतिनिधी)

Web Title: Police interrogate unauthorized construction of Breach Kandy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.