पोलीस निरीक्षकाचा कल्याण राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षावर गोळीबार

By Admin | Updated: July 8, 2016 08:12 IST2016-07-08T08:12:39+5:302016-07-08T08:12:39+5:30

कल्याण राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मदन दराडे यांच्यावर पोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांनी गोळीबार केला आहे

Police inspector firing on Kalyan Nationalist Youth Congress office | पोलीस निरीक्षकाचा कल्याण राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षावर गोळीबार

पोलीस निरीक्षकाचा कल्याण राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षावर गोळीबार

>ऑनलाइन लोकमत - 
कल्याण, दि. 08 - कल्याण राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मदन दराडे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांनी हा गोळीबार केला आहे. कल्याणमधील आधारवाडी येथे अनुभव हॉटेलसमोर रात्री 11.30 वाजता ही घटना घडली. 
 
पोलीस निरीक्षक घाडगे यांना लाच घेताना मदन दराडे यांनी रंगेहाथ पकडलं होतं. त्यांचा लाच घेतानाचा व्हिडिओही त्यांनी शुट केला होता. मदन दराडे यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे एसीबीने कारवाई केली होती. त्यानंतर घाडगेंना निलंबितही करण्यात आलं होतं. याचाच राग मनात धरुन घाडगेंनी आपल्यावर गोळीबार केल्याचा आरोप मदन दराडे यांनी केली आहे.
 
गोळी गाडीच्या काचेला लागल्याने मदन दराडे हल्ल्यातून बचावले आहेत. बाजारपेठ पोलीस ठाण्यात घाडगेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: Police inspector firing on Kalyan Nationalist Youth Congress office