शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

अमेरिकन युवतीला पोलिसांची मदत

By admin | Updated: August 1, 2016 07:02 IST

रस्ता चुकल्याने गोंधळलेल्या अमेरिकन युवतीला वेळीच ताब्यात घेऊन तिला सुखरूप तिच्या आईच्या हवाली केलं

नागपूर : रस्ता चुकल्याने गोंधळलेल्या अमेरिकन युवतीला वेळीच ताब्यात घेऊन तिला सुखरूप तिच्या आईच्या हवाली करण्याची प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळमन्यातील सहायक निरीक्षक धर्मेंद्र आवारी आणि शिपाई रुपम यांचा सत्कार केला. दीड महिन्यांपूर्वी लॉस एंजेलिस येथून भारतात पर्यटनाला आलेल्या लुसी चेन या युवतीने बेंगळुरू येथून रायपूर गाठले. तेथे महत्वाची कागदपत्रे हरविल्याचे लक्षात आल्याने ती पुन्हा नागपूर मार्गे बेंगरुळूकडे निघाली. मात्र. खासगी प्रवासी बसच्या वाहकाने तिला पारडी (कळमन्यात) उतरवून दिले. ती रस्ता विसरल्याने ईकडे तिकडे फिरू लागली. ते पाहून सडजछाप मजनू तिच्या अवतीभवती घुटमळू लागले. भाषेची मुख्य अडचण असल्याने लुसी चांगलीच गोंधळली. तिची ही अवस्था पाहून एका सद्गृहस्थाने कळमना पोलिसांना फोन केला. सहायक निरीक्षक धर्मेंद्र आवारी, रुपम आणि त्यांच्या सहका-यांनी तिला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. नंतर अमेरिकन दुतावासा मार्फत तिच्या आईला फोन केला. आई नागपुरात पोहचण्यासाठी तीन दिवस लागले. तोपर्यंत लुसीचा मुक्काम कळमना मार्केटजवळच्या एका हॉटेलात होता. लुसीने आईला आपली प्रवासयात्रा आणि कळमना पोलिसांचा सौजन्यपूर्ण व्यवहार सांगितला. कळमना पोलिसांनी नंतर या दोन मायलेकींना बेंगळुरू येथे हरविलेले लुसीचे कागदपत्र मिळवून देण्यासही मदत केली. पोलिसांचे आभार व्यक्त करीत अमेरिकन मायलेकी १८ जूनला आपल्या देशात परतल्या. दरम्यान, हा प्रकार अमेरिकन दूतावासाला कळला. त्याची दखल घेत कौन्सिलेट जनरल आॅफ द युनायटेड स्टेटस् आॅफ अमेरिकाचे कौन्सिल जनरल थॉमस वाज्डा यांनी २० जून रोजी कळमना पोलीस ठाण्याला एक पत्र पाठविले. त्यात अमेरिकन कौन्सिलने पोलिसांच्या कार्यशैलीची प्रशंसा करून त्यांचे आभारही मानले आहे. ही गौरवास्पद बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळाली. त्यामुळे त्यांनी रविवारी एका कार्यक्रमात एपीआय आवारे आणि शिपाई रुपमचे कौतूक केले. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव आणि सहआयुक्त संतोष रस्तोगी प्रामुख्याने उपस्थित होते.