शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पोलिसांना संघटनेचा अधिकार हवा

By admin | Updated: March 9, 2016 06:16 IST

राज्याच्या पोलीस दलातील सुमारे अडीच लाख कर्मचाऱ्यांना संघटना स्थापन करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी दाखल झालेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालायच्या नागपूर खंडपीठापुढे येत्या

राजेश निस्ताने,  यवतमाळराज्याच्या पोलीस दलातील सुमारे अडीच लाख कर्मचाऱ्यांना संघटना स्थापन करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी दाखल झालेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालायच्या नागपूर खंडपीठापुढे येत्या १७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्या वेळी महाधिवक्ता श्रीहरी अणे सरकारची बाजू मांडणार आहेत.१९८०च्या दशकापूर्वी राज्यात पोलिसांची संघटना होती. मात्र, त्या संघटनेच्या पुढाकाराने मुंबईत पोलिसांचे ‘बंड’ झाल्यानंतर त्या संघटनेवर बंदी घालण्यात आली आणि पोलिसांची संघटना स्थापनेची दारे बंद झाली.आता नागपूर खंडपीठापुढील सुनावणीच्या निमित्ताने हा विषय पुन्हा ऐरणीवर येणार आहे. नागपूरची ही याचिका आॅगस्ट २०११ पासून प्रलंबित असून, ती सहायक पोलीस निरीक्षक जे.व्ही. पाटील, एम.बी. तोडकर, आर.आर. महाले, यू. एच. साळगावकर व पंकज थोरात यांनी दाखल केली आहे.कोर्टातील तिसरी इनिंग्जपोलिसांनी संघटना स्थापनेच्या हक्कासाठी न्यायालयात दाद मागण्याची ही तिसरी वेळ आहे. १९९७ ला मुंबई उच्च न्यायालयात अखिल भारतीय सेनेचे उपाध्यक्ष जितेंद्र दाभोळकर यांनी पोलीस संघटनेच्या मुद्द्यावर सर्वप्रथम याचिका दाखल केली होती. १९९८ मध्ये मुख्य न्यायाधीश न्या. एम.बी. शहा व न्या. अनिल साखरे यांच्या खंडपीठाने त्यात तत्कालीन पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांना ९० दिवसांत योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश दिले. मात्र, महासंचालकांनी पोलिसांना संघटनेची गरज नाही, त्यांच्या समस्या पोलीस दरबारात सोडविल्या जातात, असे नमूद करीत संघटनेचा मार्ग बंद केला. त्यानंतर, उच्च न्यायालयात दुसरी याचिका जमादार सखाराम यादवडे यांनी दाखल केली. न्या. डी. के. देशमुख व न्या. राजीव यांच्या खंडपीठाने १६ जुलै २००९ रोजी तब्बल ११ वर्षांनी संघटनेला मान्यता दिली. तत्कालीन महासंचालक अनामी रॉय यांच्याकडे आॅगस्ट २००९ रोजी संघटनेसाठी अर्ज सादर केला गेला. दरम्यान, दरबारात समस्या सोडविण्यास आपण राजे-महाराजे आहात काय? अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले. तेव्हापासून पोलीस दरबाराचे नामकरण ‘वृंद परिषद’ झाले. परिषदेचा आडोसा घेऊन पोलिसांचा अर्ज पुन्हा फेटाळण्यात आला. केंद्र शासनाने भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांना संघटनेचा हक्क दिलेला आहे. त्याच धर्तीवर ‘पोलीस रिक्रिएशन अ‍ॅक्ट, १९६६ नुसार सामान्य पोलिसांनासुद्धा संघटनेचा हक्क दिलेला आहे. या आधीच्या पोलीस संघटनेच्या सन १९८१ मध्ये रीतसर निवडणुका होऊन जिल्हा व राज्यस्तरावर कमिट्या स्थापन झाल्या. पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक व उपनिरीक्षक ते पोलीस आयुक्त (मपोसे) अशा दोन स्वतंत्र संघटना त्या वेळी स्थापन झाल्या. राज्यस्तरीय कमिटीला मुंबईत भायखळा येथे चार हजार चौरस फुटांचे कार्यालय मिळाले. तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी त्याचे उद्घाटन केले होते. मात्र, कालांतराने मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या कारकिर्दीत पोलीस संघटवेर बंदी घातली गेली.२१ राज्यांत संघटनाआंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, नागालँड, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगण, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान या २१ राज्यांमध्ये पोलिसांच्या संघटना कार्यरत आहेत. आठ राज्यांत प्रतीक्षामहाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोरम, मेघालय, सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये संघटनेची प्रतीक्षा आहे.