पोलीस कडे तोडणे पडले महाग

By Admin | Updated: June 16, 2016 02:49 IST2016-06-16T02:49:17+5:302016-06-16T02:49:17+5:30

मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोरील पोलीस बंदोबस्त भेदून आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या जळगावच्या तरुणाचे नाव आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांच्या यादीत आल्याने त्याचे

The police had to cut down dearly | पोलीस कडे तोडणे पडले महाग

पोलीस कडे तोडणे पडले महाग

मुंबई : मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोरील पोलीस बंदोबस्त भेदून आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या जळगावच्या तरुणाचे नाव आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांच्या यादीत आल्याने त्याचे नातेवाईक आणि गावकरीही काळजीत पडले.
जळगाव जिल्ह्यातील चिंचोली गावचा रहिवासी असलेला हिरालाल प्रभाकर ढाकणे (वय २४) या तरुणाचे काल मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या. या तरुणाने आज लोकमत कार्यालयात येऊन सांगितले की, एम.कॉम.प्रथम वर्षाला असताना आपल्याला सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला होता.

Web Title: The police had to cut down dearly