शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ आयडी घोटाळ्यात पोलिसांची राज्यपातळीवरील ‘एसआयटी’ गठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 23:32 IST

राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीची पोलखोल करणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आता पोलीस विभागाची राज्यपातळीवरील एसआयटी गठीत करण्यात आली आहे.

नागपूर : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीची पोलखोल करणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आता पोलीस विभागाची राज्यपातळीवरील एसआयटी गठीत करण्यात आली आहे. राज्यभरातील सर्वच तक्रारींची याअंतर्गत एकत्रित चौकशी करण्यात येईल. नागपुरातील झोन-२ चे उपायुक्त व नागपुरातील घोटाळ्यातील एसआयटीचे प्रमुख नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात ही राज्यपातळीवरील एसआयटी काम करेल. यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.मनोज कुमार शर्मा यांनी निर्देश जारी केले आहेत.

२०१२ मध्ये शिक्षक भरतीवर बंदी असूनही हजारो बोगस नियुक्त्या करण्यात आल्याचा गंभीर घोटाळा राज्यभर उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करण्याची मागणी सातत्याने होत होती. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून ६८० बनावट शिक्षक नियुक्त्या व शालार्थ आयडी प्रकरणे समोर आली आहेत. नागपुरात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून २० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटकही झाली आहे.नागपूर पोलिस आयुक्तांनी एसआयटी नेमली आहे. मात्र याचा तपास नागपुरपुरताच मर्यादित आहे.

नागपुरसोबतच चाळीसगाव येथे तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. संबंधित पोलीस ठाण्यांकडून त्याचा तपास सुरू आहे. मात्र नागपूर एसआयटीद्वारे करण्यात आलेल्या चौकशीतून शालार्थ आयडी घोटाळा व बोगस शिक्षक नियुक्ती घोटाळयाची व्याप्ती ही संपूर्ण महाराष्ट्रातील इतरत्र जिल्हयात असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलीस विभागाने सर्वच गुन्ह्यांची एकत्रित चौकशी करण्यासाठी राज्यपातळीवरील एसआयटी गठीत करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात राज्यपातळीवर दाखल होणाऱ्या सर्व गुन्ह्यांच्या तपासासाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. या पावलामुळे आता या घोटाळ्यातील आणखी बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मेंढेंच्या जामिनावर उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी दरम्यान, माजी उपसंचालक सतीश मेंढे यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर मंगळवार २९ जुलै रोजी न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. मेंढे यांना नागपुरात चौकशीसाठी बोलविण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यांना सायबर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले नव्हते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र