कल्याणमध्ये पोलिसावर हल्ला करणा-या कार्यकर्त्यांना पोलिस कोठडी

By Admin | Updated: September 8, 2016 18:32 IST2016-09-08T18:32:05+5:302016-09-08T18:32:05+5:30

पोलीस उपनिरीक्षकालाच बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Police detained in Kalyan for attacking policemen | कल्याणमध्ये पोलिसावर हल्ला करणा-या कार्यकर्त्यांना पोलिस कोठडी

कल्याणमध्ये पोलिसावर हल्ला करणा-या कार्यकर्त्यांना पोलिस कोठडी

ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. ८ - कल्याणमध्ये गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस उपनिरीक्षकालाच बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन सुरु असताना मंगळवारी रात्री तिसगाव नाका परिसरात ही घटना घडली. तिसगाव नाक्यावर तैनात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना जरीमरी मंडळाच्या चार कार्यकर्त्यांनी बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. 
 
गणेश विसर्जनावरुन डगळे आणि या मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कार्यकर्त्यांनी डगळे यांना पाण्यात ढकलून त्यांना पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: Police detained in Kalyan for attacking policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.