पोलीस उपायुक्त बलकवडे यांची बदली

By Admin | Updated: June 26, 2016 00:22 IST2016-06-26T00:22:56+5:302016-06-26T00:22:56+5:30

पोलीस उपायुक्त शैलेष बलकवडे यांची शुक्रवारी मुख्यालयात बदली झाली. त्यांच्या जागी आजच मुंबईहून नागपुरात आलेले उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी रुजू झाले.

Police Deputy Commissioner Balkavde replaces | पोलीस उपायुक्त बलकवडे यांची बदली

पोलीस उपायुक्त बलकवडे यांची बदली

नागपूर : पोलीस उपायुक्त शैलेष बलकवडे यांची शुक्रवारी मुख्यालयात बदली झाली. त्यांच्या जागी आजच मुंबईहून नागपुरात आलेले उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी रुजू झाले.
उपायुक्त परदेशी आतापावेतो मुंबईला राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ११ मध्ये कमांडंट म्हणून कार्यरत होते. नवीन बदलीच्या आदेशानुसार आजच ते नागपुरात दाखल झाले. आयुक्तालयात त्यांनी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना परिमंडळ २ चे उपायुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. आतापावेतो ही जबाबदारी सांभाळणारे उपायुक्त शैलेष बलकवडे यांना उपायुक्त मुख्यालयाची जबाबदारी देण्यात आली. यापूर्वी मुख्यालय सांभाळणारे उपायुक्त भारत तांगडे यांची जालना येथे राज्य राखीव दलाचे (गट ३ ) समादेशक म्हणून बदली झाली. त्यामुळे ते पद रिक्त होते.

Web Title: Police Deputy Commissioner Balkavde replaces