अतुल तापकीर आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चौघांना पोलीस कोठडी
By Admin | Updated: May 16, 2017 18:50 IST2017-05-16T17:52:11+5:302017-05-16T18:50:42+5:30
ढोल ताशा या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चौघांना पोलिसांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

अतुल तापकीर आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चौघांना पोलीस कोठडी
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 16 - ढोल ताशा या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चौघांना पोलिसांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान काल रात्रीच्या सुमारास अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी आणि आणखी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पत्नी आणि एक जण अद्यापही फरार आहे. अतुल तापकीर आत्महत्या प्रकरणासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केल्याचं परिमंडळ 1चे उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितलं आहे.
ढोल ताशा चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी सोमवारी फेसबुकवर पोस्ट लिहिली आणि त्यानंतर विष पिऊन आत्महत्या केली होती. चित्रपट व्यवसायात नुकसान झाल्यानं पत्नी प्रियंका, तिचे भाऊ, मैत्रिणींनी छळ होत असल्यानं आत्महत्या करत असल्याचंही ते म्हणाले होते. या प्रकरणात पोलिसांनी कल्याण रामदास गव्हाणे आणि बापू किसन ठिगळे यांना आज पहाटे चारच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची पत्नी आणि फरार असलेल्या आणखी एकाचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, तापकीर यांनी कर्वे रोडवरील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये विष पिऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी फेसबुकवर एक पोस्टही लिहिली होती. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी चित्रपट निर्मिती व्यवसायात नुकसान झाल्यानंतरची कहाणी सांगितली होती. पत्नी मानसिक छळ करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.