धावत्या लोकलमध्ये पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

By Admin | Updated: August 7, 2016 09:37 IST2016-08-07T09:25:57+5:302016-08-07T09:37:38+5:30

पोलिस कॉन्स्टेबल अमर महादेव गायकवाड यांनी धावत्या लोकलमध्ये स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.

Police Constable's Suicide in Running Local | धावत्या लोकलमध्ये पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

धावत्या लोकलमध्ये पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ७ - पोलिस कॉन्स्टेबल अमर महादेव गायकवाड यांनी धावत्या लोकलमध्ये स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बोरीवली - चर्चगेट लोकलमध्ये ही घटना घडली. 
 
मालाड ते गोरेगाव रेल्वे स्थानका दरम्यान अमर यांनी स्वत: जवळच्या रायफलने छातीत गोळी घालून आत्महत्या केली. लोकल पेट्रोलिंगच्या डयुटीवर असताना अमर यांनी आत्महत्या केली. त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले ?, कामाचा तणाव याला कारण आहे का ? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
 
उपाचारासाठी त्यांना जीटी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अमर सध्या मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत होते. 
 

Web Title: Police Constable's Suicide in Running Local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.