पोलिसांनी केले गोमांस जप्त
By Admin | Updated: June 30, 2015 03:05 IST2015-06-30T03:05:25+5:302015-06-30T03:05:25+5:30
बल्याणी गावात पिपल फॉर अनिमल या पशू आणि प्राणी मित्र संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे टिटवाळा पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ४० ते ५० किलो गोमांस जप्त केले आहे.

पोलिसांनी केले गोमांस जप्त
टिटवाळा : बल्याणी गावात पिपल फॉर अनिमल या पशू आणि प्राणी मित्र संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे टिटवाळा पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ४० ते ५० किलो गोमांस जप्त केले आहे.
कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टिटवाळा नजीकच्या बल्याणी गावात सलीम साथीदारांसोबत गाय आणि बैल यांचे मांस विक्र ीचा व्यवसाय करीत आहे. तसेच २८ जूनला या दुकानात ११.३० वाजता गोमांस येणार आहे, अशी माहिती पिपल फॉर अॅनिमल संस्थेचे फिल्ड आॅफिसर चेतन शर्मा यांना २७ जूनला रात्री मिळाली. ,याची माहिती त्यांनी २८ जूनला टिटवाळा पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर पो.नि. व्यंकट आंधळे यांनी कर्मचांऱ्यासोबत तेथे धाड टाकली असता तेथे सुमारे ४० ते ५० किलो संशयास्पद गो मांस आढळले. यावर पोलिसांनी दुकान मालक सलीम सय्यद,अक्तर शेख व नदीम अन्सारी ( यांना तसेच या मांसची खरेदी करण्यास आलेल्या मोहम्मद नदाफ ,तौहीद खान याना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सदर मास हे म्हशीचे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले आहे. प्रयोग शाळेच्या अहवालानंतर संबधीत दोषींवर पशुसंवर्धन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार असल्याची माहीती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)