जळगावात कटप्पाविरोधात पोलीस तक्रार
By Admin | Updated: May 29, 2017 12:55 IST2017-05-29T12:23:44+5:302017-05-29T12:55:42+5:30
बाहुबली 2 सिनेमात खाटिक समाजाच्या भावना दुखावल्याच्या आरोपावरुन कटप्पाविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

जळगावात कटप्पाविरोधात पोलीस तक्रार
>ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29 - "बाहुबली" सिनेमाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोघांविरोधात अॅट्रासिटी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात यावी, यासाठी फदार्पूर येथील अखिल भारतीय संतूजी बिग्रेडचे औंरगाबाद जिल्हा सरचिटणीस अनिल रावळकर यांनी तक्रार दिली आहे.
"बाहुबली"मध्ये कटप्पाच्या तोंडी असलेल्या एका संवादावर आक्षेप घेऊन ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. "बाहुबली 2" सिनेमामधील एका दृश्यात "कटिका चीकाती" असं वाक्य कटप्पाच्या तोंडी आहे. खाटीक जात एक कलंक आहे, असा या वाक्याचा अर्थ होतो. खाटिक समाजानं या संवादाला आक्षेप घेतला आहे.
खाटिक समाज हा परंपरागत मांस विक्रीचा व्यवसाय करून आपले पोट भरतो. बाहुबली 2 मध्ये आम्हाला कठोर, अमानुष व सामाजिक संकेत न मानणारे अशा स्वरुपात दाखवण्यात आले आहे. यामुळे आमच्या समाजाची बदनामी होते, असं खाटीक समाजातील संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे दिग्दर्शक एस.एस.राजमौली व अभिनेता सत्यराज यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.