शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

पोलिसांनी धरली राजू शेट्टी यांची कॉलर: मोदी, शहांच्या विरोधात शंखध्वनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:56 IST

Rajushetti, delhi, Farmer strike, collector, Swabimani Shetkari Sanghatna, kolhapur स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चात मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरुन मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यात माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलीसांनी कॉलर धरुन खाली पाडल्याने एकच गोंधळ उडाला.

ठळक मुद्दे पोलिसांनी धरली राजू शेट्टी यांची कॉलर: मोदी, शहांच्या विरोधात शंखध्वनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुतळा जाळताना जोरदार झटापट

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चात मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरुन मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यात माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलीसांनी कॉलर धरुन खाली पाडल्याने एकच गोंधळ उडाला.

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोदी व शहांच्या नावाने शंखध्वनी करत गनिमी काव्याने आणलेल्या पुतळ्याचे दहन केले. झाल्या प्रकारावरुन संतापलेल्या शेट्टी यांनीही मुर्दाबादच्या घोषणा देत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा दम दिल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले.दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी म्हणून मंगळवारी दुपारी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकार हाय हाय, तानाशाही नही चलेगी, शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणणाऱ्या शेतकऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा सुरु झाल्या.

एवढ्यात एक चारचाकी मोर्चेकरीजवळ येऊन थांबली. पोलीसांची नजर चुकवून पिंजरापासून तयार केलेला पुतळा बाहेर काढत असतानाच पोलीसांनी धाव घेतल्याने शेतकरी आणि पोलिसांमध्ये झोेंबाझोंबी सुरु झाली. पुतळा पेटवतील म्हणून पोलिसांनीही लगेच पाण्याच्या बादल्या भरुन मारायला सुरुवात केली. एवढ्यात पुतळा खेचाखेची सुरु असताना पोलीसांनी राजू शेट्टी यांच्या कॉलरवरच हात घेतल्याने शेतकरी कार्यकर्ते अधिकच संतापले.

पोलिसांवरच धावून गेल्याने पोलिसांनी रेटारेटी सुरु केली. यात शेट्टी यांची घड्याळही हातातून पडले, चप्पल बाजूला फेकल्या गेल्या. हा प्रकार पाहून अधिक संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पुतळयाचे शिल्लक राहिलेले अवशेष पेटवून दिले. पोलीसांनी जमावाला पांगवल्याने मोठा अनर्थ टळला. १० मिनिटे चाललेल्या या झटापटीमध्ये अनेकांचे अंगावरचे कपडेही फाटले.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीdelhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संपcollectorजिल्हाधिकारीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर