शरीरसुखाची मागणी करणारा पोलीस गजाआड

By Admin | Updated: January 12, 2017 17:21 IST2017-01-12T17:21:53+5:302017-01-12T17:21:53+5:30

घराशेजारी राहणा-या महिलेला शरीरसुखाची मागणी करणा-या एका पोलीस हवलदाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. रामदास बंडूजी सपकाळ असे पोलिसाचे

Police burglary demanding bodybuilding | शरीरसुखाची मागणी करणारा पोलीस गजाआड

शरीरसुखाची मागणी करणारा पोलीस गजाआड

>ऑनलाइन लोकमत 
नागपूर, दि. 12 -  घराशेजारी राहणा-या महिलेला शरीरसुखाची मागणी करणा-या एका पोलीस हवलदाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. रामदास बंडूजी सपकाळ असे पोलिसाचे नाव असून तो नागपूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. 
एमआयडीसीत पीडित महिलेच्या घराशेजारी सपकाळचे घर आहे. पीडित महिला बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तिच्या घराच्या टेरेसवर गहू निवडत असताना त्याठिकाणी सपकाळ आला. त्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन करुन तिला शरीरसुखाची मागणी केली. यावेळी पीडित महिलेने विरोध करत आरडाओरडा केला. त्यामुळे नातेवाईक आणि आजुबाजूची मंडळी येत असल्याचे दिसताच सपकाळने तेथून पळ काढला. 
दरम्यान, पीडित महिलेने नातेवाईकांसह एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले आणि सपकाळ विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली.  यांनतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता तो दारूच्या नशेत होता. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तसेच, सपकाळच्या या कृत्याची माहिती गुरुवारी ग्रामीण पोलीसांना देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Police burglary demanding bodybuilding