५०० रुपयांची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक
By Admin | Updated: February 5, 2016 20:18 IST2016-02-05T20:10:59+5:302016-02-05T20:18:12+5:30
येथील एका पोलीस शिपायाला ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. संजय शिंदे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.

५०० रुपयांची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ५ - येथील एका पोलीस शिपायाला ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. संजय शिंदे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.
एका इसमाकडून वाहतुकीच्या नियमाअंतर्गत कारवाई करणार नाही, यासाठी ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक शाखेच्या अधिका-यांनी पोलीस शिपायी संजय शिंदेला अटक केली.
संजय शिंदे वाहतूक शाखेच्या पश्चिम विभागात कार्यरत असून हेड कॉन्स्टेबल या पदावर आहे.